Diwali : नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी ? विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची सूचना

<p>वायु प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणा अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली आहे. दिवाळीच्या तोंडावर विभागीय आयुक्तांनी केलेल्या या सूचनेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. फटाके विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची तयारी महापालिकेनं केली असताना हे पत्र त्यांना मिळालं आहे.</p>