Diwali 2021 : उत्तर महाराष्ट्रात फटाके फुटणार; Chhagan Bhujbal यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदी मागे

<p>उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते.. दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते.. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं.. दिवाळीत होणारं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी आणण्याचे आदेश, आयुक्त गमे यांनी दिले होते. विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यात ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार होती.. पण आता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर आता उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे.</p> <p>&nbsp;</p>