Diwali 2021 : नाशिकच्या शेतकरी कुटुंबात कशी साजरी केली जाते आहे वसुबारस ? जाणून घ्या

<p>आज वसुबारस अर्थातच दीपोत्सवाचा पहिला दिवस. भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्व असल्याने आजचा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागात बळीराजासाठी आजचा दिवस हा खास असतो, पहाटे पासूनच त्याची लगबग सुरु होते. गाई वासराला स्नान घालत त्यांची विधिवत पूजा करून त्यांना आज पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो, गाई वासराची पूजा केल्याने कुटुंबाला चांगले आरोग्य लाभते असेही मानले जाते.&nbsp;</p>