Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

आज लक्ष्मीपूजन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आनंदाच्या दिवाळीपर्वानिमित्ताने नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.24) घरोघरी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी (दि.23) बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. दिवाळीमधील सर्वाधिक महत्त्वाचा दिन म्हणजे लक्ष्मीपूजन आहे.

सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी अमावास्या सुरू होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. नाशिककरांनी त्यासाठी विशेष अशी तयारी केली आहे. घरोघरी देवी लक्ष्मीचे पूजन करण्यात येईल. तसेच व्यापारी बांधवांमध्ये चोपडी पूजनाचे विशेष महत्त्वाचे आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी नाशिककरांची लगबग पाहायला मिळाली. श्री लक्ष्मीची मूर्ती व प्रतिमा, तसेच फुले, वही-पेन व अन्य पूजासाहित्याची खरेदीचा यावेळी नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. तत्पूर्वी पहाटे नरकचतुर्दशी साजरी करण्यात येईल.

अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नानाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेची सुटका केली. त्यामुळे श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरकचतुर्दशी साजरी करण्यात येते. नरकासुराने मृत्यूपूर्वी वर मागितला की अश्विन कृष्ण चतुर्दशीला जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी मंगल-अभ्यंग स्नान करेल, त्याला नरकयातना होऊ नये. भगवान कृष्णाने नरकासुराचा वर मान्य केला. त्यामुळे यादिवशी अभ्यंगस्नालाला विशेष महत्त्व असल्याची आख्यायिका आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांचा अभ्यंग स्नानासाठी उटणे, सुवासिक तेल व साबण घेण्याकडे कल पाहायला मिळाला.

मुहूर्त असे…
संध्याकाळी 6.07 ते
7.30 पर्यंत चल
रात्री 10.47 ते
12.21 पर्यंत लाभ
मध्यरात्री 1.54 ते
2.55 लाभ

हेही वाचा :

The post Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.