Dr Bharati Pawar : डॉ. भारती पवार यांचा डॉक्टरकी ते मंत्रीपद असा संघर्ष… मंत्रिपदावर आईची भावना

<p>डॉक्टर भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळाल असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा त्यांनी नुकताच कारभारही स्वीकारलाय. पवार या मंत्री झाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय मात्र याचा सर्वाधिक आनंद हा त्यांच्या आई शांताबाई बागुल यांना झाला असून मुलगी मंत्री झाली आणि पंतप्रधान मोदींशेजारी जाऊन बसली हे अजूनही मला स्वप्नच वाटत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.</p>