
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण बुधवारी (दि.5) घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने नाशिककरांनी दसरा दणक्यात साजरा करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे.
हिंदू धर्मामध्ये दसरा सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे दसरा. यंदाच्या वर्षी दसरा उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. नऊ दिवसांपासून घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस पूजन केलेल्या घटांचे बुधवारी (दि.4) विसर्जन केले जाणार आहे. यानिमित्ताने सीमोल्लंघन पार पडणार आहे. तसेच या दिवशी शस्त्रपूजनही केले जात असून, त्याचीही तयारी सुरू आहे. दसर्याला रावणदहनाची परंपरा आहे. पंचवटीमधील रामकुंडासह उपनगर येथील गांधीनगर मैदान तसेच गंगापूर रोडवरील शिवसत्य मित्रमंडळाच्या मैदानावर रावणदहनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, दसर्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
सोने खरेदीसाठी सराफ बाजाराही फुलणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी आपट्याची पाने आणि झेंडूची फुुले विक्रीसाठी शहरात आणली आहेत. खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :
- दोन सेना, दोन मेळावे
- Acid In Water Bottle : वाढदिवसाच्या पार्टीत पाण्याच्या बॉटलमध्ये अॅसिड; दोन अल्पवयीन मुलांची प्रकृती गंभीर
- Acid In Water Bottle : वाढदिवसाच्या पार्टीत पाण्याच्या बॉटलमध्ये अॅसिड; दोन अल्पवयीन मुलांची प्रकृती गंभीर
The post Dussehra 2022 : आज सीमोल्लंघन appeared first on पुढारी.