Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण

एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत पेनड्राइव्ह डेटा सादर करीत सत्ताधार्‍यांची कोंडी केली. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेनड्राइव्हमध्ये आहे. या प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात आक्रमक झाले. मुख्यमंत्रीच गुंडांचे सरंक्षण करत असतील, तर पोलिस तपास कसा करणार? असा सवाल खडसे यांनी यावेळी केला.

आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांनी विधान परिषदेत अनेक मुद्दे मांडले. मध्य प्रदेशामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयांची वसुली, मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांचे रेकॉर्डिंग तसेच रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा पेनड्राइव्हमध्ये असल्याचं खडसे म्हणाले. रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नाही. आरोपींना तडीपारीच्या नोटिसा दिल्या होत्या, त्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असतील, तर पोलिस तपास कसा करणार? महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिले जाते, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? असे म्हणत खडसे यांनी या विषयाची व्हिडिओ आणि ऑडियो क्लिपचा पेनड्राइव्ह सभागृहात दिला.

हेही वाचा :

The post Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण appeared first on पुढारी.