Eknath Shinde : …त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत

Maharashtra Politics Crisis

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

आमचे सरकार येताच विकासाला चालना दिली. सत्तेवर येताच तीन महिन्यामध्ये ७२ मोठे निर्णय घेतले.  तब्बल चारशे जीआर काढले. त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुबार दौ-यावर आहेत. येथे नगरपरिषद इमारत लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, आमचे सरकार लोकांना मदत करणारे सरकार आहे. सरकारकडून सर्वसामन्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. कमी वेळात अधिक काम आमचे सरकार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. सरकारने लघुदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना प्रतियुनिट १ रूपया कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थिर आकारणीमध्येही १५ रूपये प्रतिमहिना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जे निकषात बसत नव्हते असे नुकसान देखील भरुन दिले जात आहे. आम्ही शेतक-यांना केंद्रबिंदू मानून काम करतो आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

 नंदुरबारला निधी मंजूर …

यावेळी नंदुरबारसाठी मुख्यमंत्र्यांनी 7 कोटींचा निधी मंजूर केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका फोनवर रखडलेला निधी मंजूर केल्याने यावेळी उपस्थितांनी जल्लोष केला.

The post Eknath Shinde : ...त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत appeared first on पुढारी.