Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पा मोरया! उत्साहपूर्ण वातावरणात नाशकात घराघरांत गणरायाचं आगमन

<p style="text-align: justify;">यंदाचा गणेशोत्सव कोरोना संकटात पार पडतोय. कोरोनाचे नियम पाळत घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातोय. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरगुती गणपतीच्या आगमनासाठी 5 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली आहे. तर सार्वजनिक गणपतींच्या आगमनासाठी 10 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. नाशकातही मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन पार पडत आहे.&nbsp;</p>