Ganesh Chaturthi 2021 : नाशकात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तांकडून संयमाचं दर्शन

<p>यंदाचा गणेशोत्सव कोरोना संकटात पार पडतोय. कोरोनाचे नियम पाळत घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातोय. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरगुती गणपतीच्या आगमनासाठी 5 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली आहे. तर सार्वजनिक गणपतींच्या आगमनासाठी 10 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. नाशकातही मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन पार पडत आहे.&nbsp;</p>