Ganeshotsav 2021 : नाशिकमध्ये खरेदीसाठी बाजारपेठा फुल्ल, बाप्पाच्या आमगनाची तयारी अंतिम टप्प्यात

<p>कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सवही साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेक निर्बंधांचे गणेशोत्सव साजरा करताना पालन करावे लागणार आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.</p> <p>&nbsp;</p>