Gangster Ravi Pujari : कुख्यात गुंड रवी पुजारीला नाशिक न्यायालयात

<p>कुख्यात गुंड रवी पुजारीला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. नाशिक मधील एका बांधकाम व्यवसायिकाला गोळीबार करत धमकावल्या प्रकरणी रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये ही घटना घडली होती. मुंबई पोलिसांच्या कोठडीत असलेल्या रवी पुजारीला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात नाशिककडे आणण्यात आलं. याच प्रकणात 8 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.</p>