
जळगाव: पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असला तरी म्हणावं तेवढं सोनं उतरताना दिसत नाही. सोन्याची झळाळी वाढतच आहे. सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये २४ तासांत सोन्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा प्रतितोळा ६३ हजार ५०० रुपये झाले आहेत.
जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होते. अशा ठिकाणी सोन्याचे दर आज ६३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत भाव गगनाला पोहोचल्याने सोने खरेदी करणे अवघड होत चाललं आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे दर ६१ हजार ९०० तर जीएसटीसह ६३ हजार ५०० इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक पातळीवर बँकांच्या व्याजदरात सातत्याने होत असलेले बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत.
हेही वाचा :
- तब्बल 25 हजार वर्षांपूर्वीच्या महिलेचा मिळाला डीएनए
- कालठण नंबर दोन येथे धाडसी चोरी; इंदापूर तालुक्यात भीतीचे वातावरण
- कोल्हापूर : डॉ. मारडकर यांची उचलबांगडी
The post Gold Rate : सुवर्णनगरीत सोने ६३ हजार ५०० वर appeared first on पुढारी.