
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उमराळे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा पॅनल व ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत जनसेवा पॅनलने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. सरपंचपदासह 9 जागांवर जनसेवा पॅनलचा विजय झाला. जनसेवा पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार वसंत भोये यांनी ग्रामविकास पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार कांतीलाल रहेरे यांचा तब्बल 300 हून अधिक मतांनी पराभव केला.
ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जनसेवा पॅनलच्या बेबीताई सोनवणे यांनी ग्रामविकासच्या उमेदवार आशा धात्रक यांचा 144 मतांनी पराभव केला. नवनाथ सदाशिव धात्रक यांनी ग्रामविकासचे रमेश केदार यांचा 108 मतांनी पराभव केला. त्याचबरोबर जनसेवा पॅनलच्या काळूबाई माळेकर यांनी ग्रामविकासच्या पूनम भोये यांचा 100 हून अधिक मतांनी पराभव केला.
त्याचप्रमाणे जनसेवा पॅनलचे संजय केदार, भारती केदार, शखुबाई माळेकर, अनिता अहिरे या उमेदवारांनी मताधिक्याने विजय प्राप्त केला. जनसेवा पॅनलचे नेतृत्व जे. डी. केदार, रामदास धात्रक, डॉ. पुंडलिक धात्रक, संजय सोनवणे यांनी, तर ग्रामविकासचे नेतृत्व सुनील केदार, प्रवीण केदार, शशिकांत गामणे यांनी केले.
हेही वाचा :
- Tunisha Sharma : शीझानचे दुसऱ्या तरुणीशी संबंध होते; तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप
- Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले, उपचाराकरिता मुंबईला रवाना
- Twitter New CEO : शिवा अय्यादुराईंना व्हायचंय ट्विटरचा सीईओ; मस्क यांना ट्विट करत विचारलं….
The post Gram Panchayat : उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलची सत्ता appeared first on पुढारी.