Gram Panchayat election results : येवल्यात परिवर्तनाची लाट सुसाट! निकालाने सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड

येवला (जि.नाशिक) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वत्र सत्ता परिवर्तनाची लाट आलेली दिसली.सर्व प्रमुख ग्रामपंचायतीत या निकालाने सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड मिळाली आहे.जबरदस्त रस्सीखेच असलेल्या अंगणगावला सत्तेत परिवर्तन झाले. येथे जेष्ठ नेते अंबादास बनकर,कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनलला सात जागावर बहुमत मिळाले.तर सत्ताधारी विठ्ठल आठशेरे यांना मोठा धक्का बसला आहे.

दिनेश आव्हाड पॅनलची अनपेक्षितपणे बाजी

अंदरसूल येथे धनगे - देशमुख यांच्या पॅनेलने नऊ जागांवर विजय मिळवत आघाडी मिळवली.सत्ताधारी मकरंद सोनवणे यांच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या असून तीन जागा अपेक्षांना मिळालेल्या आहेत.नगरसुल येथेही सत्तापरिवर्तन झाले असून अनिकेत पाटील व निकम यांच्या पॅनलने येथे बाजी मारली.साताळीत माजी सरपंच भाऊसाहेब कळस्कर यांना मोठा धक्का बसला असून पी.के.काळे व अर्जुन कोकाटे यांच्या पॅनलने येथे एक हाती सत्ता मिळविली.राजापूर येथेही विद्यमान सत्ताधारी पोपट आव्हाड व प्रमोद बोडके यांना धक्का बसला आहे.येथे ज्येष्ठ नेते परसराम दराडे व खरेदी विक्री संघाचे संचालक दिनेश आव्हाड यांच्या पॅनलने अनपेक्षितपणे बाजी मारून एक हाती सत्ता मिळविली.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

परिवर्तन पॅनल ८ जागांवर विजय
निमगाव मढला देखील परिवर्तन झाले असून खरेदी विक्री संघाचे संचालक
संतोष लभडे यांच्या पॅनलला ७ जागा तर नवनाथ लभडे यांना ३ जागावर समाधान मानावे लागले.कोटमगाव देवीचे येथे ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे,नाना लहरे यांच्या पँनलला ५ जागा मिळाल्या.तर शरद लहरेच्या पँनलला दोन जागावर समाधान मानावे लागले.देशमाने सत्तापरिवर्तन झाले असून रतन काळे यांच्या ग्रामविकास पॅनलला ३ जागांनी विजयी तर नाना जगताप यांचा परिवर्तन पॅनल ८ जागांवर विजय मिळाला. ठाणगावला देखील सत्ता परिवर्तन झाले.भवर गटाला सहा जागा, देविदास शेळके गटाला दोन जागा मिळाल्या.पाटोदा येथे आहेर-मेंगाने गटाकडे ११ जागा आल्याने त्यांनी सत्ता मिळवली.बोरणारे,पिंपरकर,नाईकवाडे यांना ६ जागांवर समाधान मानावे लागले.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

अनकाईलाही सत्तापरिवर्तन होऊन अलकेश कासलीवाल यांनी येथे सत्ता मिळवली.धुळगावलक अण्णासाहेब गायकवाड,दत्ता आहेर,राजेंद्र गायकवाड यांच्या पँनलला ७ जागा मिळाल्या असून येथेही सत्तापरिवर्तन झाले.कैलाश खोडके,आप्पासाहेब गायकवाड यांना ४ जागा मिळाल्या असून सत्ता गमवावी लागली.