Gram Panchayat Results : माजी सरपंचांचा अवघ्या एक मताने निसटता विजय! अभोणा ग्रामपंचायतीत सत्ताकारण

अभोणा (नाशिक) : सोमवार (ता. 18) रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये सत्ताकारणाचे सर्व गणित बदलले आहे. कळवण तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित समजल्या जाणाऱ्या अभोणा ग्रामपंचायतीच्या एकूण 13 जागांसाठी सर्व समावेशक अशा निकालामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास अभोणा चौफुली येथे गुलाल आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. मात्र पक्षाचे राजकारण करणाऱ्या उमेदवारांचे राजकारण संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. 

प्रभाग रचनेनुसार अनुक्रमे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे 

- प्रभाग क्र.1- नामदेव बुधा जोपळे (384), बेबीबाई कारभारी गांगुर्डे (503)
- प्रभाग क्र.2- सुनील नाना खैरनार (318), सुनिता राजेंद्र पवार (296), भाग्यश्री चेतन बिरारी (343), 
- प्रभाग क्र.3- राजेंद्र दौलतराव पवार (189), तेजस्विनी स्वप्नील मुसळे(244), विजया दिलीप जाधव (268)
- प्रभाग 4 सुबोध दीपक गांगुर्डे (293), किरण भोलेनाथ जगताप (311), मीरा पप्पू वाघ (304)
- प्रभाग क्र.5 मध्ये शंकर कडू पवार (328), मीराबाई रोहिदास पवार (170) 
हे उमेदवार विजयी झाले असून, सर्वाधिक मतदान मिळविण्याचा बहुमान बेबीबाई कारभारी गांगुर्डे यांनी मिळवला आहे. 

अवघ्या एक मताने माजी सरपंचाची सरशी...

अभोणा ग्रामपंचायतीत सलग नऊ वर्षे सरपंच म्हणून कार्यरत असणाऱ्या मीराबाई पवार यांनी एकूण तीन प्रभागात उमेदवारी केली. दोन प्रभागात पराभव तर, प्रभाग क्रमांक - 5 मधून अवघ्या एक मताने निवडून आल्यात. श्रीमती पवार यांना 170 मते मिळालीत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी रेखा वाघ यांना 169 मते मिळाली आहेत.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष

प्रभाग क्र. 2 व 3मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. सर्व समाजाचे नेतृत्व म्हणून निवडणुकीत उतणारे युवा कार्यकर्ते नाना खैरनार यांनी विजय मिळविल्याने व माजी सरपंच राजेंद्र पाटील, भाग्यश्री बिरारी, विजया जाधव, तेजस्विनी मुसळे, शंकर पवार, सुबोध गांगुर्डे यांनी एक हाती विजय मिळविल्याने हितचिंतकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. दरम्यान, सरपंच सोडतीमध्ये अभोणा ग्रामपंचायतीत कुणाची सरपंचपदी व उपसरपंचपदी वर्णी लागते, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश