द्राक्ष पिकाला धोका

नाशिक – यंदा द्राक्ष हंगाम उशिरा सुरू होणार असल्याचे चित्र दिसते आहे.

कारण हवामानातील बदल व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे. यंदा वातावरणातील बदल, करोनाचा फटका द्राक्ष बागांना बसणार आहे. मागील वर्षी अव्वाच्या सव्वा पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला द्राक्षे हंगाम घेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती.

यंदा करोना व हवामानाचा बदलाव, निसर्गाची अवकृपा व अपुरे भांडवल यामुळे शेतकरी वर्गाला यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा अशी व्दिधा अवस्था निर्माण झाल्याने तालुक्यातील द्राक्षे हंगाम उशीरा चालू होईल असे चिञ सध्या तालुक्यात दिसत आहे.

Leave a Reply