Gudhipadwa 2021 : नव्या हंगामाच्या मशागतीचा प्रारंभ! बदलत्या काळानुसार मोजक्याच ठिकाणी परंपरा

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. मात्र बदलत्या जमान्यात ही काही मोजक्याच ठिकाणी ही परंपरा जपली जातेय. 

नव्या हंगामाच्या मशागतीचा प्रारंभ!

चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीजीवनाचे नवे वर्ष आज.(मंगळवारी) सुरु झाले तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी उठून आपल्या नवीन जीवनाच्या नवीन वर्षाला सुरुवात केली.सकाळी लवकर उठून आपल्या शेतात जाऊन नांगर जुंपून नवीन वर्षाचे मुहूर्त केले.  नंतर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना नैवद्य देण्यात आले.मात्र ही परंपरा काही ग्रामीण भागातील ठराविक गावातील ठरावी शेतकरीच जोपासत असताना दिसून येत आहे.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

बदलत्या काळानुसार मोजक्याच ठिकाणी परंपरा

 सध्या बदलत्या तंञज्ञानामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतली कामे करुन शुभारंभ केला जातो आहे. मात्र काही शेतकऱ्यांकडे शेतात अजून पिके असल्याने शेतीकामांचा शुभारंभ करतांना शेतकामांना जागा नसल्याने शुभारंभ करता आला नाही. माञ नववर्षाचे स्वागत करतांना घरावर  गुढी उभारुन दारात रांगोळी घालून दरवाजावर फुलांचे व आंब्याचे तोरण लावले जाते, शिवाय शेतकऱ्यांकडील गुरे, गाई म्हशी, व स्वतःकडील वाहने व मोटारसायकली धुवून पुजा केली जाते. तर  मराठी नववर्ष चैञ मासाच्या पहिल्या दिवाशी गुढीपाडवा येत असल्याने घरात गोड धोड पदार्थ, पुरणपोळी बनवून नैवद्य दाखवून, रांगोळी घालून देवाची पुजा करुन नववर्षाचे स्वागत होते.

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू