Gudipadwa 2021 : “‘मी मास्क लावणार..कोरोनाला हरवणार.!” यंदाची गुढी ही कोरोनावर विजय मिळवणारी 

नाशिक : मागील वर्षीप्रमाणे यंदाची गुढी ही कोरोनावरील विजय मिळवणारी विजयपताका ठरणार असा निश्चय करीत घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून जमेल तसा हा सण साजरा करणेच पसंद केले आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले असून हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यावर मात करीत लवकरच ईडा पिडा टळो अशी भावना यानिमित्त व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामदैवतांच्या दर्शनाविनाच नूतन संवत्सरास प्रारंभ

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते. यावेळी गुढी पाडव्याचा सण 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजयभारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा या नववर्षाच्या स्वागत सणाचे महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवसाला भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याचा प्रातिनिधिक दिन मानले जाते. त्यानुसार घराबाहेर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत देवदर्शन करून करण्यात येते. मात्र, यंदाही काळाराम किंवा भद्रकाली देवी या ग्रामदैवतांच्या दर्शनाविना भाविकांना नूतन संवत्सरास प्रारंभ करावा लागणार आहे. 

घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश 
ही गुढी स्नेहाची, मांगल्याची आणि आनंदाची प्रतीक मानली जाते. प्रत्येक नववर्ष हे आपल्यासह कुटुंबाला भरभराटीचे जावो, हाच संकल्प असतो. येत्या काही दिवसांत नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दिशेने खबरदारी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाची मुभा नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत गुढीपाडवा साजरा करणेच समाजाच्या हिताचे म्हणून पसंद केले आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते. पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त
गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021
प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

अशी आहे गुढीपाडव्याची पूजा पद्धत
गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान केले जाते. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजवले जाते. गुढी उभारल्यानंतर देवाची पूजा केली जाते.