Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील त्याच्याशी मला काही घेणे-देणे नाही. असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. केशव प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गिरीश महाजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केशव प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रम (आनंदाश्रम) या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, गिरीश महाजन यांना सगळे मोठे खाते भेटतात. पण मी ज्या मतदार संघाचा आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांच्या दोन फॅक्टरी आहेत, आणि केशव प्रतिष्ठान सुद्दा त्याच मतदार संघात आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात हास्य पिकले. यावर तात्काळ टोला मारत नामदार गिरीश महाजन म्हणाले, जैन कंपनीचे मूळ भवरलाल जैन हे जामनेर तालुक्यातील आहे.

हेही वाचा :

The post Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार appeared first on पुढारी.