
जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राजपूत या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. यामुळे त्यांच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. थोडावेळ महिलेला बरेही वाटले. मात्र पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Heat Stroke)
अमळनेर ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. जि. एम. पाटील यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसांत दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या पश्चात पती, सासू सासरे, दिर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या सून होत्या.
हेही वाचा :
- Hruta Durgule : ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले…
- कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेच्या युवासेना अध्यक्ष पदावर ऋतुराज क्षीरसागर यांची नियुक्ती
- Karnataka Election Results 2023 | तिसऱ्या पिढीला आमदारकी बहाल! हुक्केरीमधून निखिल कत्ती विजयी
The post Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू appeared first on पुढारी.