Igatpuri Murder : सराईत गुन्हेगार संजय धामणेची इगतपुरीत हत्या; शहरात खळबळ

सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे याचा इगतपुरीत तिक्ष्ण हत्याराने केली हत्या ; शहरात खळबळ

इगतपुरी (जि.नाशिक) : देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इगतपुरी येथील डाक बंगला अँम्बेसिटर हॉटेलसमोर त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय धामणेच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ

देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे ( वय - 42 ) याची जुनी कुरापत काढण्यासाठी एका टोळक्याने तिक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी (दि.18) रात्री 10.45 वाजता हत्या झाली.इगतपुरी येथील डाक बंगला अँम्बेसिटर हॉटेलसमोर घरी जात असताना त्याच्यावर हल्ला झाला.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील संजय धामणे हा शुक्रवारी इगतपुरीतील डाक बंगला येथे राहणाऱ्या दुसऱ्या पत्नीकडे जात असताना टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच ठार झाला. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

धामणेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल

सहा वर्षांपुर्वी इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगार डेविड मॅनवेल याचा कल्याण भागात खून झाल्याच्या कारणावरुन संशयित म्हणून राजू धामणे हा तळोजा जेलमध्ये आहे.या खूनाचा बदला म्हणून संजय धामणेचा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. संजय धामणेवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

कट कारस्थान रचून रात्री क्रूर हत्या

तसेच मयत याचा भाऊ राजेश बबन धामणे हा डेव्हीड पॅद्रिक मॅनवेल याचे खुनाचे केसमध्ये तळोजा जेलमध्ये असुन त्याचे न्यायालयातील तारखेचे वेळी भेटण्याकरिता फिर्यादी व त्याचे नातेवाईक जात होते तेव्हा यातील आरोपीत हे देखील तारखेसाठी न्यायालयात येत होते. तेव्हा यातील आरोपी आशा मॅनवेल हिने वरिल आरोपीनां चिथावणी देऊन फिर्यादीचा मामा व मयत तसेच त्याचे साथीदार यांचा जीव घेतल्याशिवाय शांत राहणार नाही. असे कट कारस्थान करुन शुक्रवारी रात्री क्रूर हत्या केली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक एस.एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.डी.डी.पाटील, विनोद गोसावी, सचिन देसले व पथक करत आहे.

बाकी संशयितांचा कसुन शोध सुरु

इगतपुरी पोलिस ठाण्यात शनिवार (ता.19) दिपक दत्तात्रय पाटील ( वय 32 ) रा.नाशिकरोड यांच्या तक्रारीवरुन संशयित अजय पॅट्रिक मॅनवेल, सायमन उर्फ पापा पॅट्रिक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, आशा पॅट्रिक मॅनवेल सर्व (रा.इगतपुरी), राजकुमार भारती (रा.कल्याण) यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असुन यातील आशा पॅट्रिक मॅनवेल हिला ताब्यात घेतले आहे. बाकी संशयितांचा कसुन शोध सुरु आहे.