IGP दिघावकरांचा पुन्हा दणका! शेतकऱ्यांचे ठरताएत ‘हिरो’; कामगिरीचे कौतुक

०१८४२ : डॉ. प्रतापराव दिघावकर 

पोलिस महानिरीक्षकांचा व्यापाऱ्याला दणका 

कोलकता येथील व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख केले परत 

लासलगाव ( जि.नाशिक) : विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर परराज्यातही आपल्या या कामामुळे ‘हिरो’ ठरले आहेत.  त्यामुळे  पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे. 

शेतकऱ्यांचे ठरताएत 'हिरो

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर परराज्यातही आपल्या कामामुळे ‘हिरो’ ठरले आहेत. कोलकता येथील अंजना मुखर्जी या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेऊन माल पाठविण्यास टाळाटाळ करीत असलेल्या नाशिकच्या व्यापाऱ्याविरुद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे तक्रार आली होती. व्हिक्टोरिया ग्लोबल ट्रेडिंग एक्सीमचे प्रोप्रा अंजना मुखर्जी (रा. कोलकता) या कांदा व्यापाऱ्यास स्वस्तात कांदा देतो म्हणून पंढरीनाथ भास्कर शिंदे या व्यापाऱ्याने एक लाख ८० हजारांची आगाऊ रक्कम मागितली.

व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख केले परत 
मात्र, स्वत:च्या बँक खात्यावर न मागविता साई ट्रेडर्सचे प्रोप्रा सुनील भास्कर संधान (रा. टाकळी विंचूर, ता. निफाड) यांच्या बँक खात्यावर रक्कम मागविली. रक्कम मिळताच कांदा पाठविण्याची आवश्‍यकता असताना व्यापारी शिंदे याने टाळाटाळ केली. या प्रकरणी अंजना मुखर्जी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे तक्रार केली. तक्रार येताच पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लासलगाव पोलिसांना दिले. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

दिघावकरांचे अभिनंदन
निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, लासलगावचे प्रभारी पोलिस अधिकारी राहुल वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड यांनी एक लाख ८० हजार रुपये अर्जदारास परत मिळवून दिले. त्या मुळे पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांचे अभिनंदन होत आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी परराज्यातील व्यापाऱ्याचे अडकलेले पैसे स्थानिक व्यापाऱ्याकडून मिळवून दिले. त्यामुळे परराज्यातही ते आपल्या या कामामुळे ‘हिरो’ ठरले आहेत. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा