IGP प्रताप दिघावकरांचा परदेशातही डंका! परदेशी नागरिकास अवघ्या २४ तासात पैसे परत 

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी मोहिम चालवत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कोट्यावधी रुपये परत मिळवून दिले आहेत. डॉ. दिघावकरांच्या या कामाची महती आता थेट परदेशात पोहचली आहे. अशाच  नेपाळच्या एकाकांदा व्यापाऱ्यासा त्याचे पैसे अवघ्या २४ तासात परत मिळाले आहेत

नेमके घडले का?

नेपाळ येथील व्यापाऱ्यास स्वस्तात कांदा देतो म्हणून ऑनलाइन रक्कम घेतली. कांदा ही दिला नाही व पैसेही परत केले नाहीत. व्यापाऱ्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचे बघताच नेपाळच्या खरेदीदाराने व्यापाऱ्यास गाठले. मात्र, व्यापाऱ्याने बनावट धनादेश देत  फसवणूक केली.फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापाऱ्यास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची महती समजली. त्याने डॉ. दिघावकर यांची भेट घेतली.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

मोहिम पोहचली जगभरात

नाशिक परिक्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी व बेरोजगारांच्या होत असलेल्या फसवणुकीसंदर्भातील तक्रारींची तीव्रता लक्षात घेत नऊ सप्टेंबर २०२० पासून विशेष मोहीम राबवीत कोट्यवधी रुपये फसवणूकदारांना मिळवून दिले आहेत. या संदर्भातील मोहीम व त्याच्या कारवाईचे वृत्त ‘सकाळ’ ने वेळोवेळी इ-सकाळसह विविध माध्यमातून दिले होते. यामुळे ही मोहीम जगभरात पोहचली होती.

२४ तासात साडेसाह लाख मिळाले परत

नेपाळ देशातील कांदा व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना स्वस्तात कांदा देतो म्हणून ग्रीबेल एक्सपोर्टचे संचालक राहुल कचरू चौधरी (रा. निंबोळे ता. चांदवड) तांनी अर्जदाराकडून ऑनलाइन साडेसहा लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी कांदा व पैसे देण्यास टाळाटाळ केली. काही दिवसानंतर धनादेश दिले. परंतु तेही वटले गेले नाहीतचौधरी यांच्याकडे  रेग्मी यांनी वेळोवेळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कांदा द्या नाहीतर पैसे द्या अशी मागणी केली. परंतु त्यांनी टाळाटाळ केली.  रेग्मी यांना ऑनलाइन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मोहिमेची माहिती मिळाली. त्यांनी नाशिक येथे येत डॉ. दिघावकर यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. डॉ. दिघावकर यांनी आपल्या खाक्या दाखविताच अवघ्या २४ तासात नेपाळच्या खरेदीदारास साडेसहा लाख रुपये परत मिळाले. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

अधीक्षक सचिन पाटील यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक विश्‍वनाथ निमसे, रामकृष्ण सोनवणे, शिपाई प्रदीप आजगे, गणेश बागुल, सागर आरोटे यांचे पथक पाठविले. अवघ्या २४ तासात संबंधित व्यापाऱ्यास चौधरी यांच्याकडून साडेसहा लाख रुपये मिळवीत परत केले.