International Yoga Day: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विशाल प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती
International Yoga Day 2022: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा होत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे या कार्यक्रमाला उपस्थित असून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात योग प्रात्यक्षिके करण्यात येत आहेत.
नाशिक शहराजवळील त्र्यंबकेश्वर येथे यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमाच्या मेजवनीने साजरा करण्यात येत आहे. सुरवातीला या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार होते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा दौरा रद्द झाला.दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केल्यानंतर या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उपस्थित दर्शवली आहे.  त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात योग दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न होत आहे.
यावेळी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा प्रशासन योग विद्या गुरुकुल आणि श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ट्रस्ट यांच्या सहकार्याने नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी योग दिनानिमित्त सीआरपीएफचे जवान सहभागी झाले
शाह साधणार व्हिडीओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
दरम्यान योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे सदगुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलला शिळा पूजन सोहळ्यात नित्यानंद राय हे उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री अमित शाह हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. दरम्यान या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादा भुसे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
योग विद्या गुरुकुल
शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात. त्र्यंबकेश्वर जवळील योग विद्या गुरुकुल हे गेल्या अनेक वर्षांपासून योगाचे धडे देत आहे. या ठिकाणी परदेशातील अनेक नागरिक योगाचे धडे गिरवत आहेत.
हे देखील वाचा-
Eknath Shinde Live Updates : शिवसेनेत भूकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 18 आणि इतर 6 आमदार सूरतमध्ये
शिवसेनेत वादळ! एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; 'हे' आमदार एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा