Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाकूने हल्ला

जळगाव : महिलेवरील चाकूहल्ला प्रकरणी भुसावळच्या दिनदयाल नगर भागातील तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत व जखमी महिलेने तिघांविरुद्ध भा.द.वि.307 सह विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे. पिडीत महिला तिच्या सासूकडे दिनदयाल नगर भागात गेली होती.  महिला ओट्यावर गप्पागोष्टी करत बसली असतांना परिसरात राहणारे तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख, कलीम शेख सलीम शेख आणि गिरीष गोकुलसिंग जोहरी असे तिघे तिच्याजवळ आले.

चाकू लावून दिली धमकी…

यातील तस्लिम शेख याने तिला “इधर क्या कर रही है, कोई लडकी है क्या?” अशी विचारणा केली. त्यावर महिलेने आपल्याला काही माहिती नाही असे उत्तर दिले. त्यावेळी तस्लिम याने कमरेला लावलेला चाकू महिलेच्या गळ्यावर लावला. त्याचवेळी कलीम शेख आणि गिरीष जोहरी या दोघांनी तिला शिवीगाळ करत आज इसका काम तमाम कर डालते है असे म्हणत धमकी देण्यास सुरुवात केली.

आपल्या सुनेवर होत असलेला हल्ला आणि शिवीगाळ बघून तिच्या सासूने धाव घेतली. गिरीष जोहरी याने महिलेला पकडून ठेवत कलीम शेख याने तिला लाथ मारली. तस्लीम शेख याने हातातील चाकूने तिच्यावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये करत आहेत.

हेही वाचा :

The post Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.