Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई

बोगस डॉक्टर

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात बोगस डाँक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्‍यांचा अनेक भागात सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे येथे सापडून आलेल्‍या बोगस डॉक्‍टरांवर डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ. धीरज पाटील आदींनी ही कारवाई केली. मेहुणबारे (ता. चाळीसगाव) परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टि. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुमदार या चौघांवर आज कारवाई करून चौघांना या पथकाने मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. या कारवाईने मेहुणबारे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोवा : श्वानपथकाने केले 243 प्रकरणांत साहाय्य

निमा संस्थेनं केली होती कारवाईची मागणी
चाळीसगाव तालुक्यात कार्यरत असलेले सुमारे १०० बोगस डॉक्टर असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी निमा संघटनेनं केली होती. चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक या बाबत तक्रार करीत नाही. कोणाची तक्रार नसल्याचे सांगून आरोग्य विभाग सुद्धा कोणतीही कारवाई करीत नाही. वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना केवळ दुसऱ्या डॉक्टरकडे काही दिवस मदतनीस म्हणून काम केल्यानंतर स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय एखाद्या गावात सुरू करतात. आरोग्य विभागातील कर्मचारी ग्रामीण स्तरावर काम करीत असल्याने त्यांना या बोगस डॉक्टरांची माहिती असते. मात्र तेही तक्रार करीत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई appeared first on पुढारी.