Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश

अमन मित्तल : जळगाव नवे जिल्हाधिकारी,www.pudhari.news

जळगाव : टोकरे कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा प्रश्‍न गंभीर बनला असतांनाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील तब्बल १४६० प्रमाणपत्रांबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फैजपूर विभागीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या १२५० टोकरे कोळी जात प्रमाणपत्राबाबत तसेच अमळनेर प्रांत कार्यालयात प्रलंबित असलेले २१० जात प्रमाणपत्र प्रकरणावर तात्काळ निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश दिले आहेत. यामुळे जळगाव व भुसावळ परिसरातील भालशिव, प्रिंपी, कोळन्हावी, शिरावल या गावातील तसेच अमळनेर भागातील टोकरे कोळी समाज बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बारामती : माझ्या भूकंपासंबंधीच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला : रोहित पवार

१६०० प्रकरणं प्रलंबित…
जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्राबाबत मिळण्याबाबत अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठे यांनी व आदिवासी वाल्मिकलव्य सेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. यावेळी धरणे आंदोलनाची सांगता करतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठक घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत फैजपूर प्रांत कार्यालयाकडे १४०० प्रकरण तर अमळनेर प्रांत कार्यालयाकडे २१० टोकरे कोळी जमातीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची बाब समाजाचे पदाधिकारी मदन शिरसाठे यांनी लक्षात आणून दिली होती. त्यावर पण तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.

हेही वाचा : 

The post Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश appeared first on पुढारी.