Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले

जळगाव क्राईम,www.pudhari.news

जळगाव : महामार्गावर चारचाकीचा कट लागल्यानंतर झालेल्या वादातून त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी रात्री घडली होती. गोळीबारातील मुख्य संशयित करण संतोष सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यास रविवारी दुपारी वरणगावात अटक केली होती. यानंतर आता त्याचे दोन पसार साथीदार संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांना कंडारी गावातील नातेवाईकांच्या घरातून अटक करण्यात आली.

अक्षय रतन सोनवणे (वय 26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय 25, भुसावळ) हे दोन्ही तरुण अन्य दोघा मित्रांसह शुक्रवारी रात्री चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारला व त्यातून वाद वाढत गेल्यानंतर संशयित करण संतोष सपकाळे याने कमरेला लावलेला कट्टा काढून दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश गंभीररीत्या जखमी झाले होते.

पिंपळनेर : स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या तालुका समन्वयकपदी ज्योती पाटील

मध्यरात्री केली अटक…
गोळीबारानंतर करण सपकाळेसह संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) हे संशयित पसार झाले होते. गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाल्यानंतर यंत्रणा तीन दिवसांपासून त्यांच्या मागावर असताना संशयित गुंगारा देत होते. संशयित करण हा वरणगावच्या सानवी हॉटेलजवळ आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तर संतोष व जीवन हे कंडारीतील नातेवाईकांच्या घरी आल्यानंतर सोमवारी मध्यरात्री एक वाजता त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर यांनी केली. तपास निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.

हेही वाचा : 

The post Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले appeared first on पुढारी.