Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी

जळगाव : भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीने मोठ्या प्रमाणावर डोके काढले असून, त्या संदर्भातील तक्रारी सहकार विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात शहरात तीन ठिकाणी छापेमारी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छापेमारीमुळे मात्र शहरातील अनेक अवैध सावकारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अवैध सावकारी विरूध्द सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभुमीवर सहकार विभागाने दखल घेत छापेमारी करण्यात आली. हनुमान नगरातील एका व्यक्तीकडे दीड तास तपासणी करण्यात आली. मात्र काहीही आढळले नाही तर शहरातील रजा टॉवर चौकातील व्यापाऱ्याकडेही कागदपत्रांसह रजिस्टर तपासण्यात आले. मात्र तेथेही आक्षेपार्ह काहीही आढळले नाही तसेच शहरातील यावल रोडवरील एका डॉक्टरांकडेदेखील पथकाने तपासणी केली. मात्र तेथे आढळलेले पाच खरेदी खत सापडले ते त्यांचे व्यक्तीगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • सांगली : राज्यातील वीज चोरीच ग्राहकांच्या मुळावर!यांचा होता पथकात समावेश…

    पथकात सहकार अधिकारी व्ही.एन.जगताप, मनोज चौधरी, इसराव शेख, विजय काळे यांच्यासह पंच व पोलिस कर्मचारी सहभागी होते. कारवाईसाठी जिल्हाभरातून अधिकारी आणि कर्मचारी या पथकांमध्ये सहभागी झाले होते.

The post Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी appeared first on पुढारी.