Site icon

Jalgaon : रुग्णवाहिकेच्या पेमेंटसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका सुरू करण्यात आली होती. मात्र याचे पेमेंट अद्यापही अदा करण्यात आले नाही. शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही पेमेंट निघत नसल्याने व्यथित झालेल्या चाळीसगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धीरज अशोक कोसोदे (रा. वृंदावन नगर, चाळीसगाव) असे तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे खासगी रूग्णवाहिका आहेत. त्यावर आपला उदरनिर्वाह करतो. कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने धीरज कासोदे याच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. या तीनही रूग्णवाहिकांनी दिलेल्या मुदतीत आपली सेवा बजावली होती. या कालावधीत तीनही रुग्णवाहिकेचे एकूण १५ लाख ५१ हजार ४०० रुपये शासनाकडे थकीत आहे, ही थकीत असलेली रक्कम मिळावी. यासाठी धीरजने वारंवार मागणी केली. त्याच्या मागणीची चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही.

धीरजने कर्ज काढून रुग्णवाहिका घेतलेल्या आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर शुक्रवार (दि. २३) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे तातडीने धाव घेत तरुणाच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी जप्त करण्यात आले.

हेही वाचा :

The post Jalgaon : रुग्णवाहिकेच्या पेमेंटसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Exit mobile version