Site icon

Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा

जळगाव : शहरातील तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएमआयडी महाविद्यालय परिसरातील रहिवासी हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) यांच्या मोबाईलवर २८ जून रोजी एक मॅसेज आला. यात ९ लाख ५० हजार रूपयांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, समोरील व्यक्तीने तुम्हाला लकी ड्रॉ म्हणून ९ लाख ५० हजार रूपये जिंकले आहे असे सांगून जीएसटी म्हणून ९ हजार ५०० रूपये खात्यात जमा करावे लागेल असे सांगितले. त्यानुसार, हेमंतने गुगल पे वरून राहूल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यात ९ हजार ५०० रूपये जमा केले. त्यानंतर पुन्हा इन्कम ट्रॅक्स म्हणून ३३ हजार ९५० रूपये पाठविण्याचे सांगितले. त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले. परंतू लकी ड्रॉ चे पैसे आले नाही. यावरून आपली ४३ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी शुक्रवार १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.

हेही वाचा :

The post Jalgaon : 'लकी ड्रॉ' च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा appeared first on पुढारी.

Exit mobile version