Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, तरुणास कोठडी

मुलीवर अत्याचार,www.pudhari.news

जळगाव : यावल तालुक्यातील तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी विशेष न्यायालयाने आज बुधवार (दि. 25) पर्यंत तरुणास पोलिस कोठडी सुनावली आहे. वढोदा गावातील लोकेश कडू सोनवणे (30) याने गावातीलच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याने त्याच्याविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये कलम वाढविण्यात आले आहे. त्यानुसार संशयित तरुणाला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, आज बुधवार (दि. 25) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, तरुणास कोठडी appeared first on पुढारी.