Jalgaon Crime : जप्त केलेले डंपर वाळू सहित चोरीला

crime

जळगांव ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयासमोरील परिसरात विना नंबरचे  जप्त केलेले डंपर चार लोकांनी पळून नेले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांच्या चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime)

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालय व मुक्ताईनगर पोलीस स्टेशन समोरील परिसरात दहा लाख रुपये किमतीचे विना क्रमांकाचे व त्यामध्ये 32 हजाराची चार ब्रास वाळू असे दहा लाख 52 हजार रुपये किमतीचे डंपर उभे होते. 16 रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान आरोपी राजमोहन कांबळे, चालक पवन राजेंद्र ठाकरे व त्यांच्या सह दोन अनोळखी इसम यांनी सदरचे डंपर परिसरातून चोरून नेले. या प्रकरणी पोलीस नाईक प्रदीप इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे. (Jalgaon Crime)

हेही वाचा :

The post Jalgaon Crime : जप्त केलेले डंपर वाळू सहित चोरीला appeared first on पुढारी.