Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार

अत्याचार

जळगांव : जिल्ह्यातील पाचोरा तालुका व मुक्ताईनगर तालुक्यामधील एका अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी ही पाच ते सहा महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो काढून सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील सुळे येथील तीस वर्षीय महिला 3 ऑक्टोंबर दुपारी साडेचार वाजेला सोड्या गावातील श्रीकांत बाठे यांच्या शेताजवळून जात असताना या महिलेच्या समोर आरोपी बाळकृष्ण वाघ  येऊन तिचा हात पकडून केळीच्या बागेत मिळून अतिप्रसंग केला व नग्न अवस्थेतील फोटो काढून नागरिकांना दाखवेल असे धमकविले. या प्रकरणी पीडित तीस वर्षीय महिलेने मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू हे तपास करीत आहे.

दुसरी घटना ही पाचोरा तालुक्यातील पिप्री गावात सोळा वर्षीय मतिमंद मुलीवर 16 मे ते 16 ऑक्टोंबर या काळात मुलीच्या घरचे लोक शेतमजुरीला बाहेर जात असताना तीला घरी एकटी पाहून अज्ञात व्यक्तीने फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. सदर मुलीचे पोट वाढत असल्याने तिला जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी आलेले असता महिला डॉक्टरांनी ती पाच ते सहा महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. या प्रकरणी 16 वर्षीय मतिमंद बालिकेच्या आईने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पो ना प्रदीप इंगळे करीत आहे.

The post Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.