Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

बालकाचा मृत्यू,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा l सुरत ते झारखंड रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

झारखंड येथील रहिवाशी हुमायू अन्सारी (वय-३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. लग्न झाल्यापासून १० वर्षापर्यंत दांपत्याला अपत्य नव्हते. म्हणून हुमायू यांनी शालक यांची एक महिन्याची मुलगी राबीया हिला दत्तक म्हणून घेतले होते. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी ते झारखंडला जाण्यासाठी सुरत येथून रेल्वेने प्रवास करत होते. सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथून प्रवास करत असतांना बालिका राबीया हिची अचानक तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यामुळे हे दाम्पत्य भुसावळ येथे उतरले. भुसावळ रेल्वे पोलीसांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

बालिकेच्या मृत्यूमुळे दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद सरोदे करीत आहे.

हेही वाचा :

The post Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.