‘know Your Army’ प्रदर्शनातून नाशिककरांनी अनुभवली सैन्यदलाची ताकद

आर्मी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कारगिल विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली बोफर्स, स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक धनुष, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम 21)सह विविध प्रकारच्या तोफा व शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांनी अनुभवली. लष्करी जवानांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचा थरार बघताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्चा’ जयघोष केला.

ईदगाह मैदानावर भारतीय सैन्य दलातील तोफखाना केंद्र व खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून भरविलेल्या ‘नो युअर आर्मी’ या तोफखाना केंद्रातील तोफा व शस्त्रसाठा प्रदर्शनाचा रविवारी (दि.19) समारोप झाला. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उत्स्फूर्त गर्दी केली.

प्रदर्शनातील होवित्झर (एम-777), इंडियन फिल्ड सॉल्टम (155 एमएम), हलकी तोफ (105 एमएम), उखळी तोफ (130 एमएम), मोर्टार (120 एमएम), लोरोस रडार सिस्टीमसह 19 लहान-मोठ्या पल्ल्याच्या तोफांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच लष्कराकडील आधुनिक रायफल्स, मशिनगन्सची ही माहिती जाणून घेतील. सैन्य दलातील जवानांनी सायंकाळी हॉर्स रायडिंग आणि कवायतीचे सादरीकरण केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडले. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा:

The post ‘know Your Army’ प्रदर्शनातून नाशिककरांनी अनुभवली सैन्यदलाची ताकद appeared first on पुढारी.