Lasalgaon APMC मध्ये अमावस्येलाही कांदा, धान्य लिलाव सुरु राहणार, अनेक वर्षांची परंपरा बंद

<p style="text-align: justify;">आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच मोठा बदल करण्यात आला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून दर अमावस्येला बंद राहणारे कांदा आणि धान्य लिलाव यापुढे सुरु राहणार आहेत. अनेक वर्षाची ही परंपरा आता बंद होणार आहे. अमावस्येला कांदा लिलाव सुरु करावेत अशी मागणी होत होती. अखेर बाजार समिती प्रशासन, संचालक आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन अमावस्येला बाजार समितीमधील लिलाव सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 75 वर्षांपासून प्रचलित असलेला या परंपारिक अंधश्रद्धेच्या जोखडातून बाजार समिती आता मुक्त झाली आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी एका सत्रात आता बाजार समितीत लिलावाचे काम सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.</p>