Lockdown | लॉकडाऊन झाल्यास उपासमारीची वेळ; उद्योग जगतातून नाराजीचा सूर

<p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहेत. वर्षभरानंतर राज्यातील बहुतांश भाग पुन्हा लॉकडाऊनच्याच उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळं आता हातावर पोट असणाऱ्या आणि इतरही व्यवसायांमध्ये असणाऱ्या अनेकांपुढं जगायचं कसं, हाच मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळं निर्बंध कठोर करा, पण ल़ॉकडाऊन नको असाच सूर विविध स्तरांतून आळवला जात आहे.&nbsp;</p>