Lockdown News : …अन्यथा रविवारपासून जिल्ह्यात लॉकडाउन! पाहा VIDEO जिल्हाधिकारी काय म्हणाले..

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेल्या निर्बधांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वताहून नियम पाळावेत अन्यथा रविवारपासून जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. 

लॉकडाउन लागू करायला भाग पाडू नका 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्‍णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे कोरोनाचा संर्सग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बध लागू केले आहेत. मात्र शहर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नाही. उलट रुग्णांची संख्या 
वाढत आहे. सध्यास्थितीत ही संख्या अडीच हजारापर्यत वाढली आहे. रुग्ण संख्या सातत्याने वाढत असूनही नागरिकांकडून काळजी घेतली जात नाही.

 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

जिल्हाधिकारी - संयम बाळगा, आदेश पाळा 

प्रशासनाने अद्याप लॉकडाउन करण्याचा पर्याय स्विकारलेला नाही. मात्र 
लोकांकडून निष्काळजीपणा असाच सुरु राहिला तर मात्र प्रशासनाकडे कडक लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. येत्या दोन-तीन दिवसात नागरिकांचा प्रतिसाद पाहून लॉकडाउन बाबत निर्णय घ्यावा लागेल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO