Maharashtra Monsoon 2021 : Manmad, Nandgaon मध्ये मुसळधार पाऊस, Railway Track वर पाणीच पाणी

<p>नाशिकच्या नांदगाव,मनमाड परिसरात पावसाने रात्री जोरदार तडाखा दिल्याने नांदगाव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाचे पाणी नांदगाव रेल्वे स्थानकात घुसल्याने &nbsp;रेल्वेचे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. रेल्वे रुळावर जवळपास दोन फुटाच्या वरती पाणी साचल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला &nbsp;रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री अनेक प्रवाशी गाड्या मनमाड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या.त्यामुळे अनेक प्रवाशी अडकून पडले होते.मध्यरात्रीनंतर धिम्या गतीने &nbsp;रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आल्याने रेल्वेच्या प्रवाशी गाड्या उशिरा धावत होत्या.रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते</p>