Maharashtra Rains : अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका, कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

<p>&nbsp;नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसतोय. काढणीला आलेला कांदा पावसामुळे सडण्याची भीती बळीराजाला आहे. त्य़ात ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पातीचे शेंडे करपा रोगामुळे पिवळे पडताहेत. त्यात उन्हाळी कांद्याची रोपंही आता पावसामुळे खराब होताहेत. कांदा पिकाच्या नुकसानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी</p>