Maharashtra Rains : वरुणराजा प्रसन्न, धरणं भरली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

<p>नाशिकच्या गोदावरी पात्रा लगतची मंदिर सलग तिसऱ्या दिवशी ही पाण्याने वेढलेली आहेत, मध्यरात्रीनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग 4 हजार वरून 2 हजार कुसेक्स करण्यात आलाय, पावसाचा जात वाढताच पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी काठी गर्दी करू नये आशा सूचना देण्यात आल्यात, गोदावरी, वालदेवी, दारणा या सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहे, रामकुंड परिसरातुन आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी</p>