Mahashivratri 2021 : महाशिवरात्रीचा ‘हा’ योग पंधरा वर्षांनंतर जुळला! महादेवाच्या पूजेसाठी उत्तम काळ

नाशिक : शिव अन्‌ शक्तीच्या मिलनाचा महाशिवरात्री उत्सव गुरुवारी (ता. ११) साजरा होत आहे. अशातच कोरोना विषाणू संसर्गामुळे शिवमंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरीही महाशिवरात्रीनिमित्त शंकर, शिवलिंगाची नित्यपूजा होईल. त्यात चार प्रहाराच्या पूजेचा समावेश असेल. तुम्हाला माहित आहे का? महाशिवरात्रीचा हा योग पंधरा वर्षांनंतर जुळून आल्याचे धर्मशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हा काळ शंकराच्या पूजेसाठी चांगला 

कुंभ राशीतील धनिष्ठ नक्षत्र योग पंधरा वर्षांनंतर जुळून आल्याचे धर्मशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. महाशिवरात्रीच्या दिवसाची सुरवात शिवयोगात होत आहे. हा काळ शंकराच्या पूजेसाठी चांगला मानला जातो. शिवयोगात गुरुमंत्र आणि पूजेचा संकल्प सोडण्यात येतो. सकाळी नऊ वाजून २४ मिनिटांपर्यंत शिवयोग असून, त्यानंतर सिद्धियोगाला सुरवात होईल. मंत्राची साधना, ध्यान, जप केले जातात. तसेच, नवीन गोष्टीचे अध्ययन करण्यास सुरवात केली जाते. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

 

महाशिवरात्रीचा योग पंधरा वर्षांनी जुळून आला आहे. एरवी मकर राशीत श्रवण नक्षत्र असताना महाशिवरात्री साजरी होते. गुरुवारी (ता. ११) धनिष्ठ नक्षत्रामुळे चांगल्या गोष्टी घडतील. मराठी नवीन वर्ष १३ एप्रिलला प्लव संवत्सर सुरू होत आहे. त्यामुळे नवीन मराठी वर्ष मंगलमय असेल. 
-नरेंद्र धारणे, धर्मशास्त्राचे अभ्यासक  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO