Site icon

Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह

ञ्यंबकेश्वर :  पुढारी वृत्तसेवा 

आज महाशिवरात्रीनिमित्ताने सर्वत्र शिव मंदिरांमध्ये हरहर महादेव असा जयघोष दुमदुमत असतांना भगवान शिवाचे अधिष्ठान बारा ज्योतिर्लींगांपैकी एक महत्वाचे स्थान असलेले नाशिकच्या ञ्यंबकेश्वर येथे पहाटेपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी मंदिरात हजर झालेत. महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेली आहे.

भाविकांना भगवान शिवाची आराधना करण्यास महाशिवरात्रीचा हा योग साधण्यासाठी ञ्यंबकेश्वर येथे देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. आजच्या दिवशी भगवान शिवास प्रिय असलेला त्रिदल बेल येथे नित्य वाहण्यात येतो.  आज बेलपत्र अपर्ण करण्यास विशेष महत्व आहे. देवी भागवतात त्रिदल बेलाचे महत्व सांगितले आहे. बेलपत्र अपर्ण करतांना तीन ते एकवीस पानांपर्यंत बेलपत्र असतात. यामध्ये तीनपानी बेल शिवाला अपर्ण करतात. याच बरोबर धोञ्याचे फुल फळ वाहीले जाते.

कवठाचे फळ वाहन्याचा प्रघात

महाशिवरात्रीस कवठाचे फळ वाहन्याचा प्रघात आहे. त्यामुळे आज बाजारपेठ कवठाच्या फळांनी फुलली आहे. ञ्यंबकेवर येथे आज मोठया प्रमाणात रूद्राक्ष प्रसाद म्हणून वाटणारे भाविक आले आहेत. एक मुखापासून ते एकवीस मुखांपर्यंत रूद्राक्ष आढळतात. ञ्यंबकेश्वर येथे रूद्राक्षांची काही वृक्ष आहेत त्यांना बहर आला आहे. रूद्राक्ष धारण केल्याने अनेक विकार बरे होतात तसेच शांत भावमय जीवन जगण्यासाठी रूद्राक्ष धारण करण्याचा प्रघात पुर्वापार आहे.

उसाचा रसही करतात अर्पण 

महाशिवरात्र संपन्न होते आणि ख-या अर्थाने उन्हाळयास प्रारंभ होत असतो. उन्हाळयात सर्वत्र उसाच्या मधुर रसाच्या रसवंती पांथस्थांना दिलासा देतात. विशेष म्हणजे आज उसाचा रस मोठया प्रमाणात शिवपिंडीवर अर्पण केला जातो. तसेच भाविक तो अवर्जुन सेवन करतात. ञ्यंबक नगरीत आज आहोरात्र उसाच्या रसाची गु-हाळे खणाणत राहणार आहेत.

ञ्यंबकेवर येथील  त्रिभुवनेश्वर,  केदारेश्वर, ऋणमुक्तेश्वर, महादेव निलकंठेश्वर आणि आणखी काही शिवमंदिर आहेत.  भाविक या मंदिरांमध्ये मोठया संख्येने हजेरी लावतात. याच बरोबर स्थानिक भाविक प्रामुख्याने जुना महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. ञ्यंबकेश्ववर मंदिराच्या पुर्व बाजुस आहिल्या गोदावरी संगमावर असलेल्या जुना महादेव महाशिवरात्रीस अवर्जुन दर्शनास हजेरी लावतात. येथे कवठाचे फळ आणि बेल वाहण्यासाठी नागरिक सकाळपासून  उपस्थितीत आहेत.  हे अत्यंत पुरातन देवस्थान आहे. या मंदिराच जिर्नोध्दार करण्यात आला आहे. नविन  आकर्षक वास्तु भाविकांचे लक्ष वेधुन घेते. आहिल्या गोदावरीच्या संगमस्थानावर असलेल्या या प्राचीन शिवंमंदिरात आवर्जून हजेरी लावणारे शेकडो भाविक आहेत.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ञ्यंबकेश्वर  मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पेशवेकालीन परंपरेने या देवस्थानास त्रिकाल पुजा आदि  होत असतात. संपुर्ण वर्षात केवळ महाशिवरात्र या एकाच रात्रीला मंदिर आहोरत्र  भाविकांना दर्शनासाठी खुले असते. एरवी वर्षभर रात्री नऊ वाजे नंतर मंदिर बंद करण्यात येते. रात्री मंदिरात महापुजा होत असते. मध्यरात्रीला पालखी काढण्यात येते. तसेच दर सोमवारी भगवान ञ्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर जात असते. तशीच वर्षभरात इतर दिवशी सिमोल्लंघनासाठी दस-यास त्रिपुरारी पौणिर्मेस रथातुन आणि महाशिवात्रीस अशा तीन वेळेस पालखीतून सुर्वणमुकुट नेण्यात येतो. महाशिवरात्रीस पालखी पाचंआळीतुन पुर्व संस्थानीक जोगळेकर यांच्या वाडयावरून जात असते. येथे  संस्थानीक जोगळेकर पालखीचे स्वागत करतात. शहरात पालखी मार्गावर भाविक फुलांच्या रांगोळया काढतात. मंगलमय असा हा सोहळा पाहण्यासाठी  भाविक येथे येत असतात.

हेही वाचा : 

The post Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह appeared first on पुढारी.

Exit mobile version