नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठा आठ दिवस बंद राहणार

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे अशी मागणी नागरिक करत होते. मात्र यापुढे प्रशासनाकडून कुठलाही लॉकडाऊन लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनीच स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळायचं ठरवलं आहे.

अर्थचक्र सुरु राहण्यासाठी आता लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही त्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र दुसरीकडे बाजारपेठांमधील गर्दी आणि कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

त्यामुळे नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड, रविवार कारंजा, कापड बाजार, जुने नाशिक, दहीपूल, कानडे मारुती लेन, दुधबाजार, सराफ बाजार, एमजी रोड परिसरासह प्रमुख बाजारपेठा रविवार (दि. २१) पासून पुढील रविवार (दि. २८) स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी तसेच हॉकर्स असोसिएशनच्या शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, जुने नाशिक परिसर पुढील आठ दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत.

source – https://www.thalaknews.com/main-markets-in-nashik-city-will-be-closed-for-eight-days/

Leave a Reply