Makar Sankranti Festival : संक्रांतीनिमित्त देण्यात येणाऱ्या वाणांवर संक्रांत! बाजार मंदावला 

नाशिक : मकरसंक्रांतीनिमित्त महिलांकडून हळद-कुंकू करण्याची जुनी परंपरा आहे. त्यात महिला एकमेकांना विविध प्रकारचे वाण देतात. दर वर्षी या वस्तू खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. यंदा भेटवस्तूंचा बाजार मंदावला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

हवा तसा प्रतिसाद नाहीच
मकरसंक्रांतीनिमित्त विवाहित महिलांकडून संक्रांतीपासून पुढील पंधरा दिवस हळद-कुंकू कार्यक्रम होत असतो. ज्या महिलेकडून हळद-कुंकू असते, त्या महिलेकडून निमंत्रित महिलांच्या कपाळास सौभाग्यचे लेणे म्हणून हळद-कुंकू लावत त्याना आकर्षक आणि संसाराेपयोगी वस्तू भेट म्हणून दिली जाते. संक्रांतीच्या काही दिवस अगोदरपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होते. यातून मोठी उलाढाल होते. यंदा बाजार उशिरा सुरू होऊनही हवा तसा प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

\हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक सण साध्या पध्दतीने

एका दिवसावर संक्रांत आल्याने काही प्रमाणात वाणांच्या दुकानावर महिलांची गर्दी दिसली. परंतु, ती समाधानकारक नव्हती. दुसरीकडे स्टीलच्या भांड्यांना अजूनही मागणी नसल्याची माहितीही विक्रेत्यानी दिली. केवळ ५० ते ६० टक्के बाजार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक सण साध्या पद्घतीने साजरे झाले. नागरिकांमधील कोरोनाची भीती आणि लॉकडाउनमुळे व्यवहार ठप्प होऊन झालेले आर्थिक नुकसान, यामुळे नागरिक उत्साहात सण साजरे करण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्याचा परिणाम भेटवस्तूंच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
 
हलव्याच्या दागिन्यांची तितकी विक्री 

संक्रांतीनिमित्त हलव्याच्या (तिळाचे) दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बालकांना भोर नान्हान (स्नान) करण्याचीही प्रथा आहे. त्याचप्रमाणे लग्न जुळलेले असेल किंवा लग्नानंतर पहिली संक्रांत असेल, तर त्यांनाही तिळाचे दागिने भेट म्हणून दिले जातात. त्यानिमित्त विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांची विक्री होताना दिसले. 

 

भेटवस्तूंच्या यंदाच्या विक्रीवर ४० ते ५० परिणाम झाला आहे. बाजार संक्रांतीच्या खरेदीसाठी दिसणारी लगभग अजून हवी तशी दिसत नाही. 
- सविता आमले (विक्रेता) 

नागरिक नाही म्हणत असले तरी कुठे तरी त्यांच्यात कोरोनाची भीती दिसून येत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. 
- भारती कोरडे (विक्रेता)