Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

मालेगावी युवकाची हत्या,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मागील भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. दोघांनी तलवारीने त्याच्यावर वार केलेत. तर, मयताचा लहान भाऊदेखील जखमी झाला आहे. सलीम मुन्शीनगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये रविवारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अब्दुल आहद मो. इसाक उर्फ हमीद लेंडी याने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मो. इब्राहिम समसुद्दोहा (रा. गुरुवार वार्ड) याच्याशी काही युवकांचे भांडण झाले होेते. त्या भांडणाची कुरापत काढत अफजल खान गुलशेर खान, कासिम नासीर खान, आयुब खान, जखर उल्ला खान उर्फ जफा पहिलवान, वासीम भांजा (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी हल्ला चढवला. दोघांनी तलवारीने तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात इब्राहिम गंभीर जखमी झाला. त्याला वाचविण्यासाठी धावलेला लहान भाऊ अब्दुल अजिज याच्यावरदेखील तलवार आणि दांडक्याने हल्ला झाला. तोही जखमी झाला. दोघांना सामान्य रुग्णालय व तेथून खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

वर्मी घाव लागल्याने आणि अती रक्तस्त्राव झाल्याने इब्राहिम याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनेची दखल घेत तपासाला गती दिली. संशयित आरोपींवर खून, दंगा आणि आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक रत्नपारखी हे तपास करित आहेत. अब्दुलची प्रकृतीदेखील चिंताजनक असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा :

The post Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या appeared first on पुढारी.