Site icon

Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. मालेगाव येथे आज (दि.30) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते. दरम्यान भूमिपूजन करुन ते विभागीय आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येथे आढावा बैठक होईल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री हे काल (शुक्रवार) रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. ‘नाशिकचा विकास करणार’ रखडलेली कामे मार्गी लावणार असे आश्वासन त्यांनी यावेळी नाशिककरांना दिले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता ते मालेगावात दाखल झाले. तेथे दादा भुसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मालेगाव येथे आढावा बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची सभा होईल. त्यानंतर शिंदे मनमाड येथे जाणार आहेत, व पुढे औरंगाबाद असा त्यांचा दौरा असणार आहे.

The post Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Exit mobile version