Marathi Sahitya Samelan : आमदारांचा निधीमधून प्रत्येकी १० लाखांप्रमाणे १ कोटी ७० लाखांच्या निधीसाठी होकार

नाशिक ; मायमराठीच्या नाशिकमधील उत्सवासाठी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून शिल्लक असलेल्या तीन कोटींमधून आमदारांनी प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचवले. भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक आमदारांचा त्यासाठी होकार घेतला. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून किमान एक कोटी ७० लाख जमा होतील, अशी स्थिती दिसतेय. 

सरकारची घ्यावी लागेल परवानगी 

आमदार निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपयांसाठी आमदारांनी होकार दिला आहे. त्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. भुजबळ म्हणाले, की ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड केली आहे. या संमेलनातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने नाशिक महापालिकेने लक्ष द्यावे. शहर स्वच्छ-सुंदर दिसले पाहिजे. रस्ते छान असावेत. याशिवाय इतरांनीही संमेलनासाठी मदत करावी. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल